देशात महागाईचा भडका उडाला आहे. आता दुधाच्या दरात वाढ झाली आहे. मदर डेअरी पाठोपाठ आता अमूलने दूधाच्या दरात वाढ केली आहे. प्रति लिटर 2 रुपयांची दरवाढ केल्याची घोषणा केली आहे.
ही वाढ 1 मेपासून लागू झाली आहे. देशभरात अमूल दूधाच्या दरात प्रतिलीटर दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही भाववाढ लगेच गुरवारपासून (1 मे) लागू होणार आहे.
अमूल दूध 2 रुपये महाग
अमूलने आपल्या सर्व दूध प्रकारांच्या किंमतीत 2 रुपयांची वाढ जाहीर केली आहे. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात अमूल ताजा दूध मोठ्या प्रमाणावर विकलं जातं. सध्या अर्धा लिटर पिशवी 28 रुपये होती, ती आता 29 रुपये झाली आहे. नवीन दर गुरुवारपासून (1 मे) लागू झाले आहेत.
मदर डेअरीनेही केली दरवाढ
मदर डेअरी दररोज 35 लाख लिटर दूध विकते. मदर डेअरीनेही दरवाढ केली आहे. 30 एप्रिलपासून ही अंमलबजावणी करण्यात आली आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये दूध पुरवठा करणाऱ्या मदर डेअरीने 2 रुपये प्रति लिटर दरवाढ केली आहे.
