मेष : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. आरोग्य उत्तम राहील.
वृषभ : जुनी येणी वसूल होतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
मिथुन : उत्साह व उमेद वाढेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
कर्क : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वाहने जपून चालवावीत.
सिंह : नवीन हितसंबंध निर्माण होतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.
कन्या : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
तुळ : उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
वृश्चिक : खर्चाचे प्रमाण वाढेल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
धनु : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मन आशावादी राहील.
मकर : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
कुंभ : आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
मीन : राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
