साकूर परिसरातील शेतकऱ्यांसाठी खास सुवर्णसंधी, वाचा नेमकं काय आहे…

संगमनेर (DSNews24/किरण पुरी) भारत हा कृषीप्रधान देश असून, देशातील बहुतांश जनता शेतीवर अवलंबून आहे. मात्र रासायनिक शेतीमुळे जमिनीची गुणवत्ता कमी होत चालली आहे, आरोग्यावर घातक परिणाम होत आहेत आणि उत्पादन खर्च प्रचंड वाढला आहे. या सगळ्या समस्यांवर शाश्वत पर्याय म्हणून नैसर्गिक शेती एक शक्तिशाली उपाय ठरत आहे.

बहुतांश लोक शेती व्यवसाय करत असतात. परंतु शेती व्यवसाय करताना सर्वच गोष्टी शेतकऱ्यांना अत्यंत काटेकोरपणे पार पाडाव्या लागतात. शेती व्यवसाय हा कधी फायदा होतो तर कधी खुप तोटा होतो. शेती व्यवसाय अधिक बळकट व नैसर्गिक शेती करण्यासाठी एक अभियान राबविण्यात आले आहे.

श्री श्री रविशंकर यांच्या मार्गदर्शनाखालील आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेचे ‘श्री श्री इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅग्रीकल्चर सायन्सेस अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी ट्रस्ट (SSIAST), बेंगळुरू’ यांनी नैसर्गिक शेतीचे देशभर प्रसारासाठी विशेष अभियान हाती घेतले आहे. हे प्रशिक्षण कार्यक्रम देशभर राबवले जात आहेत.

याच उपक्रमांतर्गत संगमनेर तालुक्यातील साकूर येथील ग्राम सचिवालयात शेजारील सोसायटीच्या हॉलमध्ये, २३ मे ते २५ मे २०२५ दरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत श्री श्री नैसर्गिक शेती प्रशिक्षण कार्यक्रम’ आयोजित करण्यात आला आहे.

या प्रशिक्षणात काय शिकाल?

1. नैसर्गिक शेतीची मूलतत्त्वे व फायदे

2. रासायनमुक्त निविष्ठांची प्रत्यक्ष तयारी

3. कीड व रोगांवर घरगुती व प्रभावी उपाय

4. माती आणि पाण्याचे संवर्धन

5. कमी खर्चात अधिक उत्पादन

6. विषमुक्त अन्न – आरोग्यदायी जीवनशैलीसाठी

7. पुढील पिढ्यांसाठी समृद्ध शेतीचा पाया

प्रमुख प्रशिक्षक:

अशोक साबदे – राष्ट्रीय नैसर्गिक शेती प्रशिक्षक, SSIAST ट्रस्ट, आर्ट ऑफ लिव्हिंग आश्रम

सहाय्यक प्रशिक्षक:

किशोर तवरेज, कविता ढेंबरे, सुशांत सुर्वे, धैर्यशील पाटील, पवन सरगई, रचना फासाटे.

नोंदणी कशी कराल?

या प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी अनिवार्य आहे.

नोंदणी लिंक: http://aolt.in/871346

नोंदणी शुल्क फक्त ₹५००

अधिक माहितीसाठी संपर्क:

संदीप ढेंबरे – 9833379222

संगीता तवरेज – 9422505819

रचना दीदी – 9209375334

किशोर तवरेज – 9011983541

सुशांत सुर्वे – 9150175175

धैर्यशील पाटील – 8149302633

कविता ढेंबरे – 9833255376

पवन सरगई – 9765957585

नैसर्गिक शेतीकडे एक भक्कम पाऊल टाका – आर्ट ऑफ लिव्हिंगच्या उपक्रमात आजच सहभागी व्हा!

आपली जमीन, आपलं आरोग्य आणि आपला नफा – सगळं सुरक्षित!

मातीसारखी बहुमूल्य संपत्ती पुढील पिढीला सोपवताना ती जिवंत व उत्पादनक्षम असणे कशी आवश्यक आहे या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

Leave a Comment