बोटा येथील विद्या निकेतनच नाव गुजरातमध्ये झळकणार ; विद्यार्थ्यांच घवघवीत यश 

संगमनेर(DSNews24 /किरण पुरी) तालुक्यातील बोटा येथील विद्या निकेतन ग्लोबल इन्स्टिट्यूट संचलित ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी मोठं यश मिळविले आहे. तसेच विद्यानिकेतनच नाव संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात गाजवल आहे. कारण नुकताच महाराष्ट्र सीईटीचा निकाल जाहीर झाला आहे. या परिक्षेत शुभम संपत मोरे याने ९९.७५ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच शुभमला नीट परीक्षेतही ४८० गुण मिळाले आहेत. त्याचबरोबर बारावी बोर्डाच्या परीक्षेत त्याला ८० टक्के गुण मिळाले होते.

धनश्री राजेंद्र गाडेकर हिने सीईटी परीक्षेत ९९.११ टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक पटकावला आहे . तसेच नीट परीक्षेमध्ये ४२० गुण प्राप्त झाले आहे. गुप्ता नकुल याने सीईटी परीक्षेत ९८ टक्के गुण मिळवले आहे. तसेच जेईई मध्ये ९६ टक्के गुण मिळाले आहे. तसेच यश बाळू शेळके या विद्यार्थ्याला सीईटी परीक्षेत ९७.४ टक्के गुण प्राप्त झाले आहे. जेईई ९४ टक्के मिळाले आहे.

तसेच बारावी बोर्ड परीक्षेत ८१ टक्के गुण प्राप्त झाले आहे. धनश्री सतीश माळी ही इयत्ता बारावीची विद्यार्थीनी असून तिची आय.आय.टी”च्या लेव्हलचे गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेज गतिशक्ती विश्वविद्यालय वडोदरा (गुजरात)येथे निवड झाली आहे. तसेच जीईई परिक्षेत धनश्रीला ७७ टक्के गुण मिळाले.

या सर्व विद्यार्थ्यांनी ११ वी, १२ वीचे शिक्षण विद्या निकेतन कॉलेजमध्ये घेऊन जीईई/सीईटी/नीट परिक्षेचा अभ्यास केला होता. त्यासाठी त्यांना महाविद्यालयातील शिक्षकांनी खास मार्गदर्शन केले होते. या यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या सीईओ डॉ.पाटील मॅडम, सेक्रेटरी रामदास पोखरकर, प्राचार्या सुनीता कडप्पा, कॅम्पस डायरेक्टर दीपक राहणे सर यांनी या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Comment