कळस येथील ग्रामस्थांसाठी निलेश लंके प्रतिष्ठानचा खास उपक्रम 

पारनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील कळस येथील ग्रामस्थांसाठी निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने रेशनकार्ड, आधारकार्ड, बांधकाम कामगार कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. कॅम्पचे उद्घाटन खासदार लोकनेते निलेश लंके यांचे ज्येष्ठ बंधू दीपक अण्णा लंके यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कॅम्पला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आपल्या समस्या निवारण करण्यासाठी सहभाग नोंदवला.

यावेळी निलेश लंके प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष तथा नांदूर पठारचे मा.सरपंच रविंद्र राजदेव, माजी उपसरपंच पांडुरंग येवले, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब गाडगे, ॲड.सूर्यकांत काणे, गोरक्षनाथ गलांडे, सामाजिक कार्यकर्ते गणेश गलांडे, भानुदास आग्रे, भाऊसाहेब चौधरी, रवी घोलप, लखन ठाणगे, शिंदूबाई सदाशिव गाडगे, तुकाराम येवले, राजाराम मोकाशी, रामदासशेठ गाडगे, तुकाराम येवले, ग्रामसेवक खोडदे भाऊसाहेब, तलाठी बोटे आदी मान्यवरांनी उपस्थित राहून कॅम्पसाठी शुभेच्या दिल्या .

Leave a Comment