पारनेर (DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील गटेवाडी येथील सेनापदक विजेते किसन रामदास पवार व कासुबाई किसन पवार या माता पित्यांचा खास अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या खास सोहळ्यानिमित्त अशोक पवार लिखित आणि पारनेर साहित्य साधना प्रकाशित रामा कलेक्टर झाला. या कादंबरीचा प्रकाशन सभारंभाचे देखील आयोजन करण्यात आले होते.
यावेळी लोकप्रिय खासदार निलेश लंके यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. विशेषतः ग्रामीण जीवनावर आधारीत अनेक पुस्तके, कथासंग्रह अशोक पवार यांनी पुस्तकाच्या माध्यमातून रेखाटलेले आहे. त्यामुळे या गोष्टीचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना मिळणार आहे.
यावेळी नांदूर पठाराचे मा.सरपंच रवींद्र राजदेव, इंजिनिअर सतीश भालेकर, सचिन आप्पा पठारे, पानोलीचे सरपंच संदीप गाडेकर, चंद्रकांत नवले, विलास ठुबे, शिवाजी शिंदे, प्रशांत साळवे, रामभाऊ थोरात, विनोद उदार, तुषार गाडेकर, अनिल गंधकते उपस्थित राहून कादंबरीचे प्रकाशन करण्यात आले
