साकूर ब्रेकिंग! बिरेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचांचा मोठा निर्णय, एकच खळबळ

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर जवळील बिरेवाडी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच जिजाबाई भाऊसाहेब सागर यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

गेल्या तीन वर्षांपूर्वी बिरेवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत शेतकरी गट म्हणजेच कॉंग्रेसने ९ पैकी ६ जागांवर बाजी मारत ग्रामपंचायतीवर झेंडा फडकाविला होता. तसेच सरपंच पदाचे आरक्षण महिला होते. मात्र सरपंच पदासाठी शेतकरी विकास गटाच्या (कॉंग्रेस) विचारानूसार सरपंचपदासाठी एक, दीड तसेच अडीच वर्षं असा कालावधी वाटून घेण्यात आला होता.

पहिल्या एक वर्षांसाठी निलम पांडुरंग ढेंबरे यांची सरपंचपदी निवड करण्यात आली होती. त्यानंतर एक वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर निलम ढेंबरे यांनी आपल्या सरपंचपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर दीड वर्षांच्या कार्यकाळासाठी जिजाबाई भाऊसाहेब सागर यांची सरपंचपदासाठी निवड करण्यात आली होती. मात्र त्यांचाही कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर महिनाभरापूर्वी सरपंचपदाचा राजीनामा गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर यांच्याकडे दिला आहे.

तसेच गटविकास अधिकाऱ्यांनी जिजाबाई सागर यांचा राजीनामा पडताळणीसाठी ग्रामपंचायतीकडे पाठविला आहे. त्यानुसार ग्रामपंचायत सदस्यांच्या विशेष बैठकीचे १६ जुलै रोजी आयोजन करण्यात आले होते. आता पुढील निवडणूक प्रक्रिया लवकरच जाहीर झाल्यानंतर पुढील अडीच वर्षांसाठी नवीन सरपंचांची निवड करण्यात येणार आहे.

Leave a Comment