मेष : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. व्यवसायात वाढ होईल.
वृषभ : मन आनंदी व आशावादी राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
मिथुन : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने जपून चालवावीत.
कर्क : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.
सिंह : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.
कन्या : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. गुरुकृपा लाभेल.
तूळ : खर्चाचे प्रमाण वाढेल. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.
वृश्चिक : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.
धनू : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. शत्रुपीडा नाही.
मकर : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.
कुंभ : प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे प्रस्ताव समोर येतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.
मीन : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. आत्मविश्वास वाढेल.
