मेष : प्रवास सुखकर होतील. महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत.
वृषभ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.
मिथुन : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
कर्क : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.
सिंह : अनेकांचेे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
कन्या : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
तुळ : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील.
वृश्चिक : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. आर्थिक निर्णय पुढे ढकलावेत.
धनु : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. प्रवास सुखकर होतील.
मकर : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. शत्रुपिडा नाही.
कुंभ : विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
मीन : राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लावू शकाल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.
