पारनेर(DSNews24/किरण पुरी) शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. पारनेर येथील शासकीय विश्रामगृहात नुकतीच संस्थापक संतोष वाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत काही पदाधिकाऱ्यांवर संघटनेची जबाबदारी सोपविण्यात आली.
यामध्ये भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी बाळशिराम पायमोडे यांची निवड करण्यात आली. तसेच अहिल्यानगर जिल्हा संपर्कप्रमुखपदी अरूण बेलकर, पारनेर तालुका उपाध्यक्षपदी गोरख पठारे, तालुका संघटकपदी बापु गट व भास्कर गागरे यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी संस्थापक संतोष वाडेकर यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. तसेच नवीन जबाबदारी दिल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक संतोष वाडेकर, सुभाष करंजुले, अनिल सोबले, राहुल गुंड, मनोज तामखडे, संदिप शिंदे, विक्रम काळे, जालिंदर लंके, वसंत साठे, विशाल करंजुले, संजय भोर, संतोष वाबळे उपस्थित होते.
