सोलापुरात कमलाबाई पटेल नर्सिंग इन्स्टिट्यूटच्या उद्घाटनप्रसंगी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यावेळी हे दोन्हीही नेते समोरासमोर येताच राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री व काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांचे पाय धरले.
सोलापूरचे पालकमंत्री आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे चरणस्पर्श करत आशिर्वाद घेतले.
या प्रसंगानंतर मात्र या नेत्यांच्या भेटीच्या जोरदार चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगल्या होत्या. सोलापूर शहराजवळ असलेल्या कुंभारी येथील नर्सिंग इन्स्टीट्यूटचं उद्घाटन सोमवारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यावेळी हे दोन्ही नेते समोरासमोर आले होते. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे कार्यक्रम ठिकाणी पोहोचताच सुशीलकुमार शिंदे यांनी महसूलमंत्री विखे पाटील यांचे स्वागत केले.
यावेळी आदराने विखे पाटील यांनी सुशीलकुमार शिंदे यांचे चरणस्पर्श केले आणि आशिर्वाद घेतले. हे चित्र पाहून उपस्थित मान्यवर अचंबित झाले.
