साकूर ZP मिशन : कॉंग्रेस युवा चेहरा मैदानात उतरवणार.. जनार्दन आहेर यांची भूमिका काय? वाचा किरण पुरींचा रिपोर्ट 

संगमनेर (DSNews24/ किरण पुरी) सध्या जिल्हा परिषदेची निवडणूकीची रणधुमाळी सुरू असून लवकरच निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार आहे. डिसेंबर महिन्यात १५ डिसेंबरच्या आसपास जिल्हा परिषद निवडणुक लागणार असून सर्वच राजकीय पक्षांनी ज्या – त्या गटात व्युहरचना आखायला सुरुवात केली आहे. तसेच इच्छुकांनी मतदारांच्या गुप्त गाठीभेटी देखील सुरू केली आहे. परंतु गेल्या दोन दशकांपासून म्हणजेच २००२ ते २०१७ पर्यंत संगमनेर तालुक्यातील साकूर जिल्हा परिषद गटावर कॉंग्रेस पक्षाचाच सलग चार वेळा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर यांच्या नेतृत्वाखाली झेंडा फडकला आहे. त्यामुळे साकूर गट हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. या गटात कायमच थोरात विरूद्ध विखे असा सामना रंगला आहे. आजही तीच परिस्थिती आहे. मात्र आता कॉंग्रेस सलग पाचव्यांदा साकूर गटावर झेंडा फडकविण्यासाठी सज्ज झाली आहे. त्यामुळे या गटातील निवडणूकीकडे संपूर्ण जिल्ह्यांचे लक्ष लागले आहे.

तसेच विधानसभा निवडणुकीत परिवर्तनाच्या लाटेत साकूर गटातून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर व थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत खेमनर यांच्या नेतृत्वाखाली माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना १३०० मतांचं लीड दिले होते. त्यामुळे साकूर गट हा कॉंग्रेससाठी अनूकूल मानला जातो. मात्र सध्याची परिस्थिती बघता साकूर जिल्हा परिषदेसाठी कॉंग्रेसकडून कोण उमेदवार रिंगणात उतरविणार याचीच चर्चा रंगली आहे. कारण विधानसभा निवडणुकीतील माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पराभवानंतर कॉंग्रेसकडून सावधगिरी बाळगली जात आहे. परंतु या निवडणुकीत कॉंग्रेस युवा चेहऱ्याला मैदानात उतरविण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे साकूर पठार भागातील प्रगतशील शेतकरी म्हणून ओळखले जाणारे तसेच व्यावसायात अग्रेसर असणारे भाऊसाहेब बापू सागर यांचे चिरंजीव बाळासाहेब भाऊसाहेब सागर यांच नाव चर्चेत आहे. त्यामुळे साकूर जिल्हा परिषदेसाठी कॉंग्रेसकडून बाळासाहेब सागर निवडणुकीत उतरणार असल्याची पठार भागात चर्चा आहे.

कोण आहे बाळासाहेब सागर

बाळासाहेब सागर हे एक चांगले बिझनेस मेन आहे. एक सुशिक्षित युवक म्हणून त्यांची ओळख आहे. गेल्या अनेक वर्षांपासून साकूर पेठेत ते मेडिकल व्यावसाय करतात. त्यामुळे त्यांचा पठार भागात मोठा जनसंपर्क आहे. एक शांत, मनमिळावू आणि अडीअडचणीला सर्वसामान्य जनतेला मदत करण्यासाठी कायमच धावून जातात.

माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन आहेर यांचे बंधू 

बोटा गटातील राजकीय क्षेत्रात नावाजलेले माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन आहेर हे बाळासाहेब सागर यांचे सख्खे मावस भाऊ आहे. त्यामुळे आहेर व सागर कुटुंबाच अत्यंत जिव्हाळ्याच नातं आहे. आहेर यांचा देखील नातेवाईक मोठ्या प्रमाणात साकूर गटात आहे.

बाळासाहेब सागर यांचा कायमच मदतीचा हात 

बाळासाहेब सागर हे एक असे नाव आहे की, साकूर व पंचक्रोशीत क्रिडा स्पर्धा असो, कोणताही धार्मिक कार्यक्रम असो, पायी दिंडी सोहळा असो त्यासाठी ते अत्यंत मनोभावे मदत करत असतात. कायमच ते धावून जातात.

युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदाची संधी 

गेल्या काही दिवसांपूर्वी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली तसेच युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा डॉ जयश्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेब सागर यांच्यावर युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. बाळासाहेब सागर यांनी केलेल्या कार्याची दखल माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतली होती.

बाळासाहेबांचे वडील भाऊसाहेब सागर यांचा मोठा जनसंपर्क 

प्रगतशील शेतकरी म्हणून ओळखले जाणारे भाऊसाहेब सागर हे बाळासाहेब सागर यांचे वडील आहे. साकूरसह पठार भागात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. तसेच जवळपास गटातील प्रत्येक गावात नातेवाईक देखील मोठ्या प्रमाणात आहे. तसेच भाऊसाहेब सागर हे विविध संस्थावर देखील आहे. साकूर पठारभागात त्यांचं एक मोठं नाव आहे. आजपर्यंत त्यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसचे एकनिष्ठ काम केले आहे. तसेच या निवडणुकीत त्यांचे चिरंजीव बाळासाहेब यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

जनार्दन आहेर यांची भूमिका ठरणार निर्णायक 

बोटा गटातील माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन आहेर ज्यावेळी संगमनेर विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात शिवसेनेकडून उभे राहिले होते त्यावेळी भाऊसाहेब सागर यांच्या परिवाराने माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा प्रचार न करता जनार्दन आहेर यांचा प्रचार केला होता. कारण रक्तातील नात्याची आपुलकी त्यावेळी सागर कुटुंबियांनी जपली होती. जनार्दन आहेर यांचा त्या निवडणुकीत पराभव झाला होता. मात्र कॉंग्रेसशी एकनिष्ठ असलेले सागर कुटुंबियांनी जनार्दन आहेर यांचा प्रचार केलेली चर्चा रंगली होती. त्यामुळे आता जनार्दन आहेर सागर कुटुंबियांना मदत करणार का? त्यांची भूमिका काय असणार? अशी चर्चा संपुर्ण पठार भागात रंगली आहे.

Leave a Comment