विखे पाटलांचे विश्वासू समर्थक सरपंच रविंद्र दातीर यांचं नाव पिंपळगाव देपा गणातून चर्चेत, वाचा किरण पुरींचा रिपोर्ट

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून कोणत्याही क्षणी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकांची निवडणूक आयोग घोषणा करू शकते. काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच सदस्यपदाच आरक्षण सोडत निघाली. त्यानंतर इच्छुक उमेदवारांनी अक्षरशः पायाला भिंगरी लावून प्रचाराला सुरुवात केलीय. तसेच मतदारांच्या गाठीभेटी देखील सुरू केली आहे.

महायुतीकडून रविंद्र दातीर यांचं नाव चर्चेत 

राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा समजला जाणाऱ्या संगमनेर तालुक्यातील साकूर जिल्हा परिषद गटातील पिंपळगाव देपा गणासाठी सर्वसाधारण आरक्षण निघाले आहे. त्यामुळे या गणातून अनेक इच्छुक उमेदवारांची चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये महायुतीकडून खांबे गावचे सरपंच तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे विश्वासू समर्थक म्हणून ओळखले जाणारे रविंद्र दातीर यांचं नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे. तसेच रविंद्र दातीर पिंपळगाव देपा गणातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आहे. त्यामुळे त्यांनी देखील या निवडणुकीसाठी दंड थोपटले आहेत. तसेच रविंद्र दातीर यांची एक वेगळी ओळख असून सर्वसामान्यांत मिळून मिसळून राहणारे नेतृत्व असून त्यांनाच उमेदवारी द्यावी अशी मागणी पिंपळगाव देपा गणातील गावांमधून होताना दिसत आहे.

रविंद्र दातीर यांची राजकीय पार्श्वभूमी काय?

खांबे गावातील रविंद्र दातीर रहिवासी आहे. गावच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सर्वसामान्यांना सोबत घेऊन दणदणीत विजय मिळवून ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवला आहे. तसेच आज ते विद्यमान सरपंच आहे. तसेच राजकीय क्षेत्रात त्यांचा चांगला मोठा अनुभव आहे. त्यामुळे त्यांची एक युवा नेता म्हणून ओळख आहे. तसेच पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, मा. खा. डॉ सुजय विखे पाटील, आमदार अमोल खताळ यांच्याशी रविंद्र दातीर यांचे घनिष्ठ संबंध आहे.

उच्चशिक्षित सुशिक्षित युवकांच्या गळ्यातील ताईत

सरपंच रविंद्र दातीर यांनी उच्च विद्यािभूषित इंजिनियरिंग क्षेत्रामध्ये मास्टर डिग्री मिळवली आहे. तसेच त्यांना सर्व विषयांचा चांगला अभ्यास आहे. एखादा विषय ते सहज हाताळून तो मार्गी लावण्याचे काम करतात. याच शिक्षणाचा फायदा घेत त्यांनी गावात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहे. तसेच त्यांच्याकडे युवकांचा मोठा वर्ग आहे. त्यामुळे ते युवकांच्या गळ्यातील ताईत बनले आहे.

खांबे गावाचा कायापालट 

खांबे गावचे सरपंच रविंद्र दातीर यांनी एकट्या खांबे गावात 5 वर्षाच्या सरपंच कालावधीत 50 कोटी पर्यंतचा विकासकामांसाठी निधी उपलब्ध केला. यामाध्यमातून त्यांनी ना. राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली गावात विविध विकासकामे केली. त्यामुळे विकासकामांचा निधी कसा आणायचा हे रविंद्र दातीर यांना चांगलच माहिती आहे. गावातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी अंदाजे २४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून मुळा डॅम वरून पाइपलाईन द्वारे पाणी उपलब्ध करण्याच काम सुरू आहे. त्यामुळे पंचायत समिती सदस्य झाल्यावर हाच अनुभव त्यावेळी त्यांना काही येणार असल्याची चर्चा पिंपळगाव देपा गणातून होत आहे.

साकूर पठार भागाचा पाणी प्रश्न सोडविणार….

गेल्या ४० वर्षांपासून साकूर पठार भागात पाणी प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे या पठार भागात ऐन उन्हाळ्यात मोठी पाणी टंचाई निर्माण होत असते. हाच महत्त्वाचा प्रश्न जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून पाणी प्रश्न सोडविण्याचा निर्धार रविंद्र दातीर यांनी केला आहे.

रविंद्र दातीर का हवेत उमेदवार?

पिंपळगाव देपा गणातून पंचायत समितीसाठी रविंद्र दातीर योग्य उमेदवार असल्याच बोललं जातं आहे. तसेच त्यांना सर्व गोष्टी जवळून माहिती आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांची त्यांना जाणीव आहे. आणि कायमच ते जनतेत राहून काम करू शकतात म्हणून रविंद्र दातीर महायुतीकडून उमेदवार हवे असे काही जाणकारांचे मत आहे.

पिंपळगाव देपा गणात कोणती गावे

पिंपळगाव देपा गणात वरवंडी, मांडवे बुद्रुक, खांबे, डोळासणे, शिंदोडी, कर्जुले पठार, खरशिंदे, रणखांबवाडी, कौठेमलकापूर, दरेवाडी या गावांचा समावेश आहे.

Leave a Comment