पुणे – आगामी नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर पुणे जिल्ह्यातील भोर शहरात राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. गेल्या दहा वर्षांपासून सत्तेवर असलेला भाजपचा बालेकिल्ला आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात जाण्याच्या मार्गावर आहे.
भाजपचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र आवारे आणि माजी नगराध्यक्षा निर्मला आवारे यांनी थेट राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला आहे.
रामचंद्र आवारे हे भाजपचे ज्येष्ठ नेते संग्राम थोपटे यांचे निकटवर्तीय मानले जातात. संग्राम थोपटे यांनीच काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता त्यांचेच विश्वासू सहकारी आवारे दांपत्याने भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली येण्याचा निर्णय घेतला. हा प्रवेश आमदार शंकर मांडेकर यांच्या उपस्थितीत पार पडला, तर अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली झाल्याचे सांगितले जात आहे.
