बिरेवाडी सोसायटीच्या नुतन इमारतीचा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते रविवारी भव्य शुभारंभ 

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर जवळील बिरेवाडी येथील गजानन सहकारी दूध उत्पादक संस्थेच्या नुतन इमारतीच भूमिपूजन व विविध विकास कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या नुतन इमारतीचा भव्य उद्घाटन समारंभ सोहळा वार – रविवार दि. ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता बिरेवाडी येथे होणार आहे. हा समारंभ सोहळा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी विधानपरिषदेचे मा. आ. डॉ. सुधीरजी तांबे असणार आहे.

कोण मान्यवर राहणार उपस्थित 

यावेळी सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार सत्यजित तांबे, जिल्हा बॅंकेचे माजी चेअरमन बाजीराव पा. खेमनर, एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ जयश्री थोरात, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर, थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात, जिल्हा बँकेचे व्हा. चेअरमन माधवराव कानवडे, संगमनेर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष अजय फटांगरे, राजहंस दूध संघाचे व्हा. चेअरमन राजेंद्र चकोर, शेतकी संघाचे चेअरमन संपतराव डोंगरे, जिल्हा बँकेचे संचालक गणपतराव सांगळे, थोरात कारखान्याचे व्हा. चेअरमन पांडुरंग घुले, अमृतवाहिनी बॅंकेचे चेअरमन सुधाकर जोशी, व्हा. चेअरमन नानासाहेब शिंदे, थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत खेमनर, शांताराम कढणे, माजी पंचायत समिती सदस्य अशोक हजारे, भगवान उद्योग समूहाचे संस्थापक आदिकराव खेमनर, असंघटित कामगार चे तालुकाध्यक्ष जयराम ढेरंगे, महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती मिरा शेटे, साहेबराव बारवे, राजहंस दूध संघाचे संचालक तुकाराम दातीर, पांडुरंग वामन, अमृतवाहिनी बॅंकेचे संचालक श्रीकांत गिरी, माजी सरपंच जिजाबाई सागर, थोरात कारखान्याचे संचालक रामदास धुळगंड सर, रावसाहेब वर्पे, उपसरपंच पोपट नान्नर, उपनिबंधक संतोष कोरे, तालुका विकास अधिकारी अशोकराव थोरात, प्रकाश कडलग, ग्रामविकास अधिकारी सागर रसाळ, सिताराम शिंदे उपस्थित राहणार आहेत.

या सोहळ्याची सोसायटी व दूध संस्थेच्या चेअरमन, व्हा. चेअरमन व संचालक मंडळांनी जय्यत तयारी केली आहे.

Leave a Comment