साकूर गटावर कॉंग्रेसचे बाळासाहेब सागर मारणार पंजा, थेट भाऊ मैदानात..

संगमनेर (DSNews24/किरण पुरी) सध्या जिल्हा परिषदेची निवडणूकीची रणधुमाळी सुरू असून लवकरच निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार आहे. अंदाजे डिसेंबरमध्ये १५ तारेखच्या आसपास जिल्हा परिषद व पंचायत समितींची निवडणुक लागण्याची शक्यता असून सर्वच राजकीय पक्षांनी ज्या – त्या गटात व्युहरचना आखायला सुरुवात केली आहे. तसेच इच्छुक उमेदवारांनी मतदारांच्या गुप्त गाठीभेटी देखील सुरू केल्या आहेत.

मात्र गेल्या दोन दशकांपासून म्हणजेच सन २००२ ते २०१७ पर्यंत संगमनेर तालुक्यातील साकूर जिल्हा परिषद गटावर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस पक्षाचाच सलग चार वेळा झेंडा फडकला आहे. त्यामुळे साकूर गट हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र आता सलग पाचव्यांदा साकूर गटावर झेंडा फडकविण्यासाठी कॉंग्रेस सज्ज झाली आहे. त्यामुळे या गटातील निवडणूकीकडे संपूर्ण जिल्ह्यांचे लक्ष लागले आहे. सलग पाचव्यांदा कॉंग्रेसकडून कोणता उमेदवार साकूर गटावर पंजा मारणार याचीच चर्चा रंगली आहे.

संभाव्य उमेदवार बाळासाहेब सागर यांना अनेकांचा जाहीर पाठिंबा 

मात्र सध्या कॉंग्रेसकडून प्रगतशील शेतकरी भाऊसाहेब बापू सागर यांचे चिरंजीव युवा नेते सुप्रसिद्ध व्यावसायिक बाळासाहेब भाऊसाहेब सागर यांचे नाव जवळ जवळ निश्चित झाले आहे. त्यामुळे बाळासाहेब सागर हे कॉंग्रेसचे उमेदवार असण्याची शक्यता असून त्यांनी तसा साकूर गटात जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. होम टू होम प्रचार करत मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या जात आहे. बाळासाहेब सागर यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. त्यांना सोशल मिडियातून देखील प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. तसेच अनेक युवकांनी त्यांना जाहिर पाठिंबा दिला आहे.

भावासाठी भावाने कसली कंबर 

त्यातच बाळासाहेब सागर यांचे बंधू सागर किराणा दुकानाचे मालक बाबाजी सागर यांनी सुद्धा देखिल भावासाठी कंबर कसली आहे. बाबाजी सागर साकूर पठार भागातील एक नामांकित नाव असून त्यांचा अफाट जनसंपर्क साकूर गटासह बाहेरगावी आहे. त्यामुळे सध्या बाळासाहेब सागर यांच पारडं जड असल्याची चर्चा आता रंगली आहे. तसेच कॉंग्रेसच्या बाळासाहेब सागर यांना मतदारांची चांगलीच पसंती वाढत चालली आहे. तसेच बाळासाहेब सागर यांना जर संधी मिळाली तर ते पारदर्शक काम करू शकतात अशी भावना देखील अनेक मतदारांनी व्यक्त केली.

Leave a Comment