संगमनेर(DSNews24/किरण पुरी) गेल्या अनेक वर्षांपासून संगमनेर तालुक्यातील साकूर येथील मातोश्री हॉस्पिटलच्या माध्यमातून गोरगरीबांसाठी आरोग्याच्या दृष्टीने विविध शिबिरे राबवून सेवा देण्याच महान कार्य डॉ. पवन गंगाराम खेमनर करत आहे. सर्वसामान्य नागरिकांशी नाळ जोडून असलेले डॉ. पवन खेमनर यांनी यंदाच्या वर्षीपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रक्त तपासणी शिबीर आयोजित केले आहे. वार – गुरूवार दि. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते २ वाजेपर्यंत साकूर येथील मातोश्री हॉस्पिटलमध्ये हे खास शिबिर सर्वसामान्य नागरिकांसाठी ठेवण्यात आले असल्याची माहिती डॉ. पवन खेमनर यांनी दिली आहे.
अवघ्या १०० रूपयांत तपासणी
विशेषतः या शिबीरात ३०० रूपयांत ज्या तपासण्या होणार आहे त्या अवघ्या १०० रूपयांत करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त डॉ पवन खेमनर यांनी राबविलेल्या स्तुत्य उपक्रमाचे संपुर्ण पठार भागातून कौतुक करण्यात येत आहे.
शिबिरात कोणत्या तपासणी होणार
शिबीरात बी.एस.एल म्हणजेच रक्तातील साखरेच्या प्रमाणाची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच ब्लड ग्रुप म्हणजेच रक्त गटाची तपासणी होणार आहे. त्याचबरोबर एच. बी म्हणजेच हिमोग्लोबिन व ब्लड प्रेशर म्हणजेच बी. पी तपासणी करण्यात येणार आहे. या सर्व तपासणी एकाचवेळी करण्यात येणार असून तपासणीनंतर लगेच रिपोर्ट मिळणार आहे.
साकूरमध्ये पहिल्यांदाच स्तुत्य उपक्रम
सर्वात मोठी बाजारपेठ आणि रहदारीचे ठिकाण म्हणून साकूरची ओळख आहे. साकूरमध्ये बऱ्यापैकी खाजगी रूग्णालय व एक ग्रामीण रुग्णालय आहे. परंतु मातोश्री हॉस्पिटलचे डॉ. पवन खेमनर हे दरवर्षी नागरिकांसाठी रक्तदान शिबिरापासून ते विविध उपक्रम राबवित असतात. मात्र एकाच वेळी पाच ते सहा तपासणी करून देण्याचा साकूरमध्ये पहिल्यांदाच असा स्तुत्य उपक्रम राबवत असल्याचा बघायला मिळत आहे.
