मेष : संततीचे प्रश्न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
वृषभ : राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. प्रॉपर्टी आणि गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.
मिथुन : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.
कर्क : आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. व्यवसायाची उलाढाल वाढेल.
सिंह : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. शासकीय कामे मार्गी लागतील.
कन्या : वस्तू गहाळ होणार नाही, याची दक्षता घ्यावी. खर्चाचे प्रमाण वाढेल.
तूळ : मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन परिचय होतील.
वृश्चिक : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. शासकीय क्षेत्रातील व्यक्तींना सुयश लाभेल.
धनू : गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.
मकर : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.
कुंभ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. नवी दिशा आणि नवा मार्ग सापडेल.
मीन : हितशत्रूंवर मात कराल. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.
