संगमनेर(DSNews24) तालुक्यातील अंभोरे येथे महायुतीचे नेते सुरजित खेमनर, संतोष बलसाने आणि मंजाबापू साळवे यांच्या पुढाकारातून आदिवासी समाजातील सुमारे वीस बांधवांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा उत्साहात पार पडला.
शिवसेनेत प्रवेश केलेल्यांमध्ये रामनाथ बर्डे, पोपट बर्डे, विष्णू बर्डे, मंगेश बर्डे, अर्जुन बर्डे, सुनील पवार, शिवाजी पवार, आशा पवार, संदीप बर्डे, लक्ष्मण जाधव, अर्चना बर्डे, शिवाजी मोरे, सलमान बर्डे, अनिता मोरे, सुरेखा बर्डे, कोंडाजी जाधव, पोपट जाधव आदींचा समावेश आहे. सर्वांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेत पक्षाशी निष्ठा व्यक्त केली. यावेळी नवप्रवेशित तरुणांनी सांगितले की, कोणत्याही परिस्थितीत या भागात शिवसेनेची ताकद वाढवून आमदार खताळ यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. आदिवासी समाजाच्या प्रश्नांसाठी संघटितपणे काम करू.
यावेळी बोलताना आमदार अमोल खताळ म्हणाले की, आदिवासी समाजाचे जे-जे प्रश्न प्रलंबित असतील, ते महायुतीच्या माध्यमातून शंभर टक्के सोडवण्याचा आमचा प्रयत्न राहील. शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
अंभोरे येथील जवळपास वीस आदिवासी बांधवांनी आज शिवसेनेत प्रवेश करून आमच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. पक्षात त्यांना योग्य तो मान-सन्मान आणि संधी दिली जाईल. त्यांच्या कोणत्याही अडीअडचणी सोडवण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहू. जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून त्यांच्या समस्या तातडीने मार्गी लावल्या जातील. आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही ठोस पावले उचलणार आहोत.
आमदार अमोल खताळ
