संगमनेर (DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर येथील बस कंडक्टर सोमनाथ सुखदेव मधे ( वय ४८) यांचं ड्युटीवर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याची घटना वार – शनिवार दि. २१ मार्च रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडलीय. संगमनेर – डिग्रस ही बस डिग्रस येथे मुक्कामी होती. आज सकाळी डिग्रस येथून बस निघायच्या आधी सोमनाथ मधे यांना अस्वस्थ वाटू लागले होते.
यावेळी त्यांना चक्कर आल्याने उलटी झाली. त्यानंतर मधे यांना तातडीने संगमनेर येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाला. मधे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. मात्र या घटनेने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मधे २००४ पासून बस कंडक्टर सेवेत म्हणून कार्यरत होते.
