साकुरमध्ये ईदनिमित्त मुस्लिम बांधवांच सामुहिक नमाज पठण

संगमनेर(DSNews24 / किरण पुरी) तालुक्यातील साकूर येथील मुस्लिम बांधवांनी महिनाभर रोजे करून सश्रध्द भावनेने अल्लाहची इबादत केल्यानंतर शनिवारी सकाळी ९ वाजता ईदगाह मैदानावर ईद-उल-फित्र ( रमजान ईद) निमित्त सामूहिक नमाज पठण केले. यावेळी नमाज पठणानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांवर शुभेच्छांचा वर्षाव केला. तसेच गेले महिनाभर रमजानचे रोजे करून मुस्लिम बांधवांनी अल्लाह व त्यांचे प्रेषित मोहम्मद पैगंबरांविषयी यावेळी श्रध्दा प्रकट केली. तसेच घरोघरी शिरखुम्यार्चा आस्वाद घेत सर्वांनी ईदचा आनंद लुटला.

दरम्यान शुक्रवारी (दि. २० मार्च) चंद्रदर्शन होताच ईद का चाँद मुबारक म्हणून मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा व्यक्त केल्या. तसेच ईदच्या दिवशी सकाळी ९ वाजता साकुरमधील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधव नवीन कपडे परिधान करून व अत्तर लावून प्रसन्न चित्ताने नमाजासाठी एकत्र आले होते. यावेळी सामूहिक नमाज पठण व प्रार्थना करण्यात आली. यावेळी घारगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांच्यासह पोलिस कर्मचारी उपस्थित होते. तसेच मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment