बिग ब्रेकिंग! तुकाराम मुंढेसह १० IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

राज्यात पुन्हा एकदा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. राज्यातील १० बड्या आयएएस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. यामध्ये आएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांचाही समावेश आहे. मुंढे यांची २१ वर्षात २५ वेळा बदली झाली आहे. तर अश्विनी भिडे यांचीही बदली करण्यात आली आहे.

१.श्री. लोकेश चंद्र (IAS:RR:१९९३), अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि., यांची मुख्यमंत्री यांचे अतिरिक्त मुख्य सचिव, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

२.श्रीमती अश्विनी भिडे (IAS:RR:१९९५), मुख्यमंत्री यांचे अतिरिक्त मुख्य सचिव, यांची बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

३.श्री. विकास चंद्र रस्तोगी (IAS:RR:१९९५), अतिरिक्त मुख्य सचिव (कृषी), कृषी व पशुसंवर्धन विभाग, मंत्रालय, मुंबई, यांची अतिरिक्त मुख्य सचिव (वित्तीय सुधारणा), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

४.श्रीमती विनिता वैद्य सिंघल (IAS:RR:१९९६), प्रधान सचिव, आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन व मदत कार्य (R&R), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई, यांची प्रधान सचिव, मृद व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

५ श्री. परिमल सिंह (IAS:RR:२००४), प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (POCRA), मुंबई, यांची सचिव (कृषी), कृषी व पशुसंवर्धन विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

६.श्री. तुकाराम मुंढे (IAS:RR:२००५), सचिव, दिव्यांग कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई, यांची सचिव, आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन व मदत कार्य (R&R), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

७.श्री. लहू माळी (IAS:SCS:२००९) यांची व्यवस्थापकीय संचालक, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प लि., मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

८ श्री. माणिक गुरसळ (IAS:SCS:२००९) यांची सचिव, दिव्यांग कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

९ श्रीमती प्रेरणा देशभ्रतार (IAS:RR:२०१०), सह आयुक्त, राज्य कर विभाग, मुंबई, यांची आयुक्त, मत्स्यव्यवसाय विभाग, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

१०.श्री. पृथ्वीराज बी. पी. अतिरिक्त आयुक्त,पुणे महानगरपालिका, पुणे यांची आयुक्त, वसई-विरार महानगरपालिका, या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

Leave a Comment