राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवार जाहीर, “या” नावाची घोषणा 

राहुरी – निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, बारामती व राहुरी या दोन विधानसभा मतदारसंघांसाठी २३ एप्रिल २०२६ रोजी मतदान होणार आहे. तर ४ मे रोजी मतमोजणी पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. असे असतानाच आता शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा अक्षय शिवाजीराव कर्डिले यांना भारतीय जनता पार्टीकडून विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी त्यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्रातील २०२६ च्या विधानसभा पोटनिवडणुकांसाठी अक्षय शिवाजीराव कार्डिले यांच्या नावाला मंजुरी दिली आहे. याबाबतचे पत्र काढण्यात आले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर होत असलेल्या या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीकडून राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या निवडणूक रिंगणात असणार हे निश्चित आहे. मात्र राहुरीमधून भाजपा कोणाला तिकीट देते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर भाजपाने राहुरीमधून आपला उमेदवार जाहीर केला आहे. राहुरीमधून भाजपाने अक्षय शिवाजीराव कर्डीले यांना उमेदवारी दिली आहे. वडिलांच्या निधानानंतर भाजपाने त्यांच्या मुलालाच उमेदवारी जाहीर केली आहे.

Leave a Comment