संगमनेर – विद्या निकेतनमध्ये विद्यार्थी गुणगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न

संगमनेर(DSNews24) तालुक्यातील बोटा येथील विद्या निकेतन ग्लोबल इन्स्टिट्यूट्सतर्फे अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दहावी व बारावी परीक्षेत यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विद्यार्थी गुणगौरव पुरस्कार सोहळा २०२६ उत्साहात आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमास संस्थेचे सचिव प्रा. रामदास बबन पोखरकर सर, CEO डॉ. विद्युलता शेखर पाटील मॅडम, ॲडव्हाझर डॉ. बी. जी. शेखर पाटील सर, कोर्डीनेटर श्री. आदित्य शेखर पाटील सर तसेच कॅम्पस डायरेक्टर श्री. दीपक रहाणे सर प्रमुख उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांच्या करिअरविषयक जाणीवा वाढविण्यासाठी आणि त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी या प्रसंगी विशेष करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत करिअर मार्गदर्शक प्रा. संतोष गोरडे सर यांनी विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक, व्यावसायिक व स्पर्धात्मक क्षेत्रांतील संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी विद्या निकेतन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मूळजकर आर. एम., विद्या निकेतन फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिंदे के. के., विद्या निकेतन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्सचे प्राचार्य डॉ. पवार एस. बी., विद्या निकेतन इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या श्रीमती सुनिता कडप्पा मॅडम, विद्या निकेतन आयटीआयचे प्राचार्य श्री. अभंग ए. बी. तसेच सर्व विभागांचे शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या गुणगौरव सोहळ्यास अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचा लाभ घेतला. गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. तसेच या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, करिअर नियोजन आणि भविष्यातील यशासाठी नवी प्रेरणा व दिशा मिळाली.

कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन विद्या निकेतन ग्लोबल इन्स्टिट्यूट्सच्या सर्व विभागांच्या समन्वयातून यशस्वीरित्या पार पडले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण व योग्य मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याच्या संस्थेच्या ध्येयाचा हा उपक्रम एक महत्त्वपूर्ण भाग ठरला.

Leave a Comment