अकोले तालुक्यातील पश्चिम भागात पाऊस सुरु आहे. हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी उगमस्थान असलेले मुळा नदीवरील आंबीत धरण भरले. त्यामुळे मुळा नदी वाहती झाली. रविवारी (28 जून ) रोजी 193 दशलक्ष घनफूट क्षमतेच्या आंबित धरणाच्या भिंतीवरून 100 ते 200 क्यूसेक असा विसर्ग मुळा नदी पात्रात झेपावला. हा प्रवाह आता पिंपळगाव खांड धरणाकडे झेपावला आहे. पिंपळगाव खांड धरणाचा पाणीसाठा वाढू लागला आहे. हेच पाणी पुढे मुळा धरणात येणार आहे. तुलनेत पाऊस कमी असला तरी पहिले छोटे धरण भरल्याची सुवार्ता ठरली आहे.
