नांदेड व औरंगाबाद येथील तिनहीं सभा महाराष्ट्रात गाजल्यानंतर, पुढील राजकीय वाटचालीसाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी 2 मे रोजी हैदराबाद येथे झालेल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये 288 मतदारसंघ लढविण्याचे जाहीर केले. त्यानुसार प्रत्येक मतदारसंघातून प्रचार यात्रा फिरण्यासाठी कार्यकर्त्यांची कार्यशाळा व पुढील नियोजनाचे चर्चासत्र 19 व 20 मे नांदेडला होणार असल्याची माहिती शेतकरी नेते संतोष वाडेकर यांनी दिली आहे.
वाडेकर पुढे म्हणाले की, तेलंगणा मॉडेल प्रमाणे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना सुद्धा, सुविधा उपलब्ध व्हाव्या व त्या सुविधांची माहिती, प्रचार यात्रे दरम्यान प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी, त्यासाठी नियोजन केल्या जात आहे. शेतकऱ्यांसाठी गोदावरी व कृष्णा नदी जोड प्रकल्प (कालेश्वरम पाणी योजना) राबवली आहे वीस लाख एकर शेतीसाठी मोफत पाणी दिले आहे. तसेच पूर्ण वेळ सिंचन दिले जात आहे. शेतकऱ्यांना मोफत वीज पूर्ण दाबाने २४ तास दिली जाते कसलाही चार्ज नाही, पेरणी व खरीप हंगामात एकरी दहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर दिले जातात त्यामुळे शेतकरी आनंदात आहे.
प्रशासना मधली जी काही चुकीचे पद्धतीने वागणाऱ्या प्रथा सर्व बंद केलेले आहेत शेतकरी वर्गाच्या सर्व पिकांना आधारभूत किमती प्रमाणे आठ हजार खरेदी केंद्र तयार करून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे राज्य सरकार शेतकऱ्यांचा विमा भरते व शेतकरी कुटुंबात कोणी दगावल्यास पाच लाख रुपये तात्काळ वारसाच्या खात्यावर आठ दिवसाच्या आत दिले जातात रयतू बंधू योजनेतून यंत्रसामग्री व अवजारे 90 टक्के सबसिडी व अनुदान दिले जात आहे. निराधार व भूमिहीन लोकांस घरकुल योजना राबवली जात आहे, राज्यात तलाठी पद व कार्यालय बंद केले आहे. डिजिटल धरणी पोर्टल माध्यम निर्माण करून क्रांती केली आहे सिंचन योजनेतून चार हजार तलाव भरले जात आहे त्यामुळे विहीर पुनर्भरण झाले आहे.
अवकाळी पाऊस आणि नुकसान झाल्यास एक महिन्यात भरपाई दिली जात आहे सद्यस्थितीमध्ये जो काही अवकाळी पाऊस झाला व त्यामुळे जे धानाचे नुकसान झाले आहे सरकारने जो पूर्वी भाव दिलेला होता त्याच भावात भिजलेले धानसुद्धा विकत घेतले आहे निराधार व अपंग यास प्रति महिना तीन हजार रुपये मासिक दिले जातात मंदिर व्यवस्थेमध्ये पुजाऱ्यांना पगार व मंदिरात जो काही दानपेटीतनं निधी तयार होतो हा सर्व सरकारी दप्तरी जमा होतो जगातील सर्वात मोठ्या नामांकित अशा कंपन्या तेलंगण राज्यात आलेले आहेत व्यवसायास पंधरा दिवसात परवाने दिले जातात अशा प्रकारच्या लोकप्रिय व लोक हिताच्या योजना राबवणारे आधुनिक काळात बळीराजाचे राज्य निर्माण करत आहेत
सामान्य जनतेला दिलासा देण्याचे काम तेलंगाना सरकार करीत आहे. महाराष्ट्रात सुद्धा ह्या योजना लागू व्हाव्या . यासाठी के. चंद्रशेखर राव आणि त्यांच्या प्रमुख नेत्यांनी, महाराष्ट्रात राजकीय आघाडी उभी करण्याचे ठरविले आहे. महाराष्ट्रातील 288 मतदारसंघात या कामाचे नियोजन होऊन पुढील राजकीय नीती आखण्यासाठी कार्यकर्त्यांचे शिबिर नांदेड येथे घेण्यात येत आहे.
महाराष्ट्र हे तेलंगणा राज्याच्या तिप्पट मोठे आहे, परंतु या ठिकाणी या सुविधा मात्र अपूर्ण आहेत. त्या सुविधा पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रात सुद्धा अबकी बार, किसान सरकार येणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व बीजेपी या चारही राजकीय पक्षांनी सत्तेत येऊन सुद्धा शेतकरी आत्महत्या वाढवील्यात, मात्र शेतकरी आत्महत्या कमी होण्यासाठी नियोजन केल्या जात नाही, ही फार मोठी शोकांतिका आहे. महाराष्ट्रात प्रत्येक तासाला एक शेतकरी आत्महत्या करतो आहे. या देशात शेतकऱ्यांचे हितांच्या योजना आणण्यासाठी, महाराष्ट्रात आमदार, खासदार भारत राष्ट्र समितीचे निवडून आणण्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी वाटचाल सुरू केली. या देशात मुबलक पाणी, कोळसा आहे. महाराष्ट्र राज्याचे उत्पन्न तेलंगणा सरकार पेक्षा तिप्पट आहे. महाराष्ट्रात फार मोठी गुंतवणूक व व्यापारी वसाहत आहे. तरी शेतकऱ्यांना सुविधा मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष वाढलेला दिसतो. महाराष्ट्र में धन की कोई कमी नही ,तो मन की कमी है!
महाराष्ट्रातील राजकारणात आता के. चंद्रशेखर राव यांच्या सहकार्याने शेतकऱ्यां ना दिलासा मिळण्याचे चिन्ह वाढीस लागले असून, शेतकरी कार्यकर्ते तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव यांच्या पाठीशी उभे आहेत. महाराष्ट्रात अबकी बार, किसान सरकार आणण्यासाठी 288 मतदारसंघात घोडदौड करीत आहेत.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र संपर्क प्रमुख तेलंगणा आमदार श्री जीवन रेड्डी, भारत राष्ट्र समितीचे महासचिव हिमांशूजी तिवारी, महाराष्ट्र किसान समितीचे अध्यक्ष माणिकजी कदम , कोकण मुंबई प्रांत समन्वयक प्रा. विजय मोहिते, माजी खासदार हरिभाऊजी राठोड, माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे, विदर्भाचे शेतकरी नेते श्री धनंजय पाटील काकडे, दशरथ सावंत, बाळासाहेब देशमुख पुणे विभगिय समन्वयक, सोमनाथ थोरात, टिळक भोस, नाना बच्छाव अध्यक्ष भारत राष्ट्र किसान समिती उत्तर महाराष्ट्र, निखिल देशमुख, ज्ञानेश वाकुडकर, यांच्यासह महाराष्ट्रातील बी. आर. एस. च्या सर्व विभागाचे प्रमुख समन्वयक , संपूर्ण मतदार संघातून बळीराजा रथयात्रेचे नियोजनासाठी, सर्वजण प्रयत्नवादी आहेत.
पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीच्या यशस्वीतेसाठी प्रत्येक मतदारसंघातून येणाऱ्या कार्यकर्त्यांना नांदेड येथील कार्यशाळेत मार्गदर्शन होईल. या कार्यशाळेला महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघातून दोन-तीन कार्यकर्ते व सर्व जिल्ह्यातील प्रमुख नेते उपस्थित राहतील. या चर्चासत्राचा समारोप झाल्यानंतर पुढे शिवतीर्थावरून व नागपूर येथील दीक्षाभूमीवरून ही प्रचार यात्रा महाराष्ट्रातील 288 मतदारसंघात पोहचणार आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोठ्या संख्येने शेतकरी, व महिला आघाडी प्रचार यात्रेत सामील होऊन तेलंगणा मॉडेलची माहिती देण्यात येईल अशी माहिती शेतकरी नेते संतोष वाडेकर यांनी दिली आहे
