मोठी बातमी! बाळासाहेब थोरातांचा मोठा दावा, म्हणाले…

पिंपरी चिंचवड काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा गुरवारी (ता.८) रात्री पार पडला. या मेळाव्यात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मोठा दावा केला.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतून पक्षाला मिळालेली नवसंजीवनी पाहता येत्या लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे सरकार येईल, असे ते म्हणाले.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे चाळीस खासदार आणि दोनशे आमदार निवडून येतील, अशी भविष्यवाणीही थोरातांनी यावेळी केली. शहरातील पिंपरी, चिंचवड, भोसरी तिन्ही विधानसभा लढू आणि जिंकू. फक्त त्यासाठी येथे पक्षाची चांगली बांधणी करा, असे ते म्हणाले. महापालिका निवडणुकीतही अशा पध्दतीने काम केले तर तेथेही काँग्रेसची सत्ता येईल, असा मोठा दुसरा दावा त्यांनी केला.

नंतर त्याला पक्षाचे शहराध्यक्ष डॉ.कैलास कदम यांनीही आपल्या भाषणात दुजोरा दिला.

भाजपवर हल्लोबोल करताना थोरात म्हणाले, “धर्मांध भाजप जातीचे राजकारण करून जातीय तेढ निर्माण करत आहे. दोन धर्मात भांडणे लावून त्यावर भाजप सत्तेची पोळी भाजून केंद्रात आणि राज्यात मनमानी कारभार करत आहे. या सर्व प्रकाराला सर्वसामान्य जनता कंटाळली असल्याने कर्नाटकात सत्तांतर झाले”, असंही ते म्हणाले.

Leave a Comment