सावधान! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना मोठा अलर्ट, पुढील दोन दिवस ‘या’ लाटेचा इशारा

पावसाळा सुरू झाला तरी देखील राज्यातील बहुतांश भागात उष्णतेच्या झळा अद्यापही जाणवत आहेत. जून महिना संपायला अवघे काही दिवस बाकी आहेत. मात्र राज्यात अजूनही पाऊस पडला नाही.

अशातच आता भारतीय हवामान खात्याने पुढील दोन दिवस प्रामुख्याने विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.

राज्यातील तापमान सरासरीपेक्षा पाच ते सात अंशानी अधिक आहे. विदर्भातील गोंदिया भंडारा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यांत पुढील दोन दिवस उष्णतेची लाट असणार आहे त्यामूळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Leave a Comment