शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीलाही भगदाड पाडण्यात भारतीय जनता पक्षाला अखेर यश आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह गळाले लागले आहेत.
राष्ट्रवादीतील काही नेत्यांचा आज (रविवार) शपथविधी पार पडला. यावेळी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
उपमुख्यमंत्री म्हणून आतापर्यंत अजित पवार यांच्यासह १० जणांनी हे पद भूषविले आहे.
यापूर्वी अजित पवार यांनी या पदाची पहाटेचा शपथविधी धरून तीन वेळा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. आज त्यांनी शपथ घेतल्याने ते राज्याचे ११ उपमुख्यमंत्री ठरले.
