मोठी बातमी! छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटलांसह राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

अजित पवार यांनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राजभवनातील दरबार हॉलमध्ये आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आज अजित पवारांनी विरोधी पक्ष नेत्याचा राजीनामा देत राष्ट्रवादीला रामराम केला आहे.

अजित पवारांनी चार वर्षात तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.

पहाटेच्या शपथविधीनंतर आता दुपारच्या शपथविधीच्या चर्चा होणार आहे. पहाटेच्या शपथविधीवरुन शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आरोप-प्रत्योराप झाले होते. पहाचेच्या शपथविधीनंतर 72 तासात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे सरकार पडले होते.

मात्र, आता दुपारी अजित पवार यांनी शपथविधी घेतली आहे. अजित पवारांसह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ,धनंजय मुंडे, आदिती तटकरे ,धर्मरावबाबा अत्राम,संजय बनसोडे ,अनिल पाटील यांनी मंत्री पदाची शपथ घेतली.

अजिप पवारांसोबत राष्ट्रवादीचा एक गट शिंदे-फडणवीस सरकारसोबत सामील झाला आहे.

Leave a Comment