महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आमचे नेते व मार्गदर्शक होते. त्यांच्याबद्दल माझ्या मनात अजूनही आदर आहे. मात्र, मी आदरणीय शरद पवार साहेबांसोबतच आहे असे स्पष्टीकरण माजीमंत्री आ. प्राजक्त तनपुरे यांनी दिले आहे. आमदार तनपुरे यांच्या भुमिकेच्या माध्यमांवरील चर्चेला त्यामुळे पुर्णविराम मिळाला आहे.
राज्यात झालेल्या राजकिय भुकंपानतंर बोलताना आ. तनपुरे म्हणाले, त्या रात्री अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक घेतल्याचे समजले. मात्र, मी या बैठकीला उपस्थित नव्हतो. आणि मला या बैठकीचे निमंत्रण नव्हते.
मी ढोकी, जि. उस्मानाबाद येथे नातेवाईकाकडे मुक्कामी असल्याने दुसर्या दिवशी या घडामोडींची माहिती मिळाली. तेव्हा मी थेट पुणे येथे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार साहेबांना भेटण्यासाठी गेलो.
अजितदादांचे अनेक वेळा फोन आल्याने मी त्यांनाही आज भेटण्यासाठी गेलो होतो. मी कुठेही दिसलो तरी मी माझ्या भुमिकेशी ठाम आहेे. शरद पवार साहेबांशी व राष्ट्रवादी पक्षाशी माझी निष्ठा कायम असून सत्तेसाठी मी माझी भुमिका बदलणार नाही. असे आ. तनपुरे यांनी स्पष्ट केले.
