अजित पवारांच्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे, यातच आता एकनाथ खडसे यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्याने राजकारणात चर्चा रंगली आहे.
आपली सहा वर्ष आमदारकी शाबूत आहे आणि शरद पवार यांच्यासारखा दिग्गज नेता आपल्या सोबत राहणार असल्याने आपल्याला चिंता नसल्याचं एकनाथ खडसे म्हणाले.
शिवाय आपल्याला आता कोणत्या निवडणुका लढवायच्या नाहीत, रोहिणी खडसे या राजकीय वारसा पाहतील, अशी भूमिका एकनाथ खडसे यांनी जाहीर केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
