ठाकरे गटाचे ४ आमदार शिंदे गटात…..

ठाकरे गटाचे एकामागोमाग एक शिलेदार शिंदे गटात प्रवेश करत आहे. ठाकरे गटाला शिंदेंच्या बंडापासून लागलेली गळती सुरूच असलेली पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी मनिषा कायंदे आणि त्यानंतर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिंदे गटात प्रवेश केला.

यानंतर आता ठाकरे गटातील आणखी चार आमदार शिंदे गटात प्रवेश करणार आहे, असा दावा मंत्री उदय सामंत यांनी केला आहे.

मंत्री उदय सामंत सध्या अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान मंत्री उदय सामंत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. उदय सामंत यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

दोन महिन्यांपूर्वी उदय सामंत यांनी सांगितलं होतं की, ठाकरे गटातील सहा आमदार शिवसेना शिंदे गटात येणार आहे. त्यापैकी आता दोन आमदार शिंदे गटात आले आहेत. ठाकरे गटाचे आणखी चार आमदार आमच्या संपर्कात आहे. ठाकरे गटाचे चारही आमदार वेळेवर येतील, असा दावा सामंत यांनी केला आहे.

Leave a Comment