शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप पार पडल्यानंतर सरकारने ४१ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश काढला आहे. शिंदे-फडणवीस सरकारकडून संबंधित सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्याची यादी शुक्रवारी संध्याकाळी प्रसिद्ध करण्यात आली.
यामध्ये राज्यातील अनेक महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. अनेक जिल्ह्यांना नवे जिल्हाधिकारी मिळाले आहेत.
सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची अवघ्या महिनाभरात पुन्हा बदली करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच तुकाराम मुंढे यांची मराठी भाषा विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. तुकाराम मुंढे यांची आता कृषी आणि पशूसंवर्धन विभागाचे सचिव म्हणून बदली झाली आहे.
राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी –
1. राजेंद्र शंकर क्षीरसागर – मुख्य सचिव कार्यालयाचे सहसचिव, मंत्रालय, मुंबई यांची जिल्हाधिकारी, मुंबई शहर मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
2. वर्षा ठाकूर-घुगे – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड यांची जिल्हाधिकारी लातूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
3. संजय चव्हाण – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांची अतिरिक्त मुद्रांक नियंत्रक, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
4. आयुष प्रसाद – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे यांची जिल्हाधिकारी, जळगाव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
5. बुवनेश्वरी एस – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे यांची जिल्हाधिकारी, वाशिम म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
6. अजित कुंभार – सह आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका यांची अकोला येथील जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
7. डॉ. श्रीकृष्णनाथ बी. पांचाळ, – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, यवतमाळ यांची जिल्हाधिकारी, जालना म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
8. डॉ. पंकज आशिया – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांची यवतमाळ येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
9. कुमार आशीर्वाद – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली यांची जिल्हाधिकारी, सोलापूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
10. अभिनव गोयल – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, लातूर यांची जिल्हाधिकारी, धुळे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
11. सौरभ कटियार – मुख्य कार्यकारी अधिकारी, झेडपी, अकोला यांची जिल्हाधिकारी, अमरावती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
12. तृप्ती धोडमिसे – प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी धुळे यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, झेडपी, सांगली म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
13. अंकित,- प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी अहेरी, गडचिरोली यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, झेडपी, जळगाव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
14. शुभम गुप्ता, – प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी अटापली SDO, पो.भारमरागड, ITDP, गडचिरोली यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
15. मीनल करनवाल, – प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, ITDP, नंदुरबार NANDURBAR यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
16. डॉ. मैनाक घोष – प्रकल्प अधिकारी, ITDP, गडचिरोली -सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, गडचिरोली यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, यवतमाळ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
17. मनीषा माणिकराव आव्हाळे – प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, ITDP, सोलापूर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
18. सावन कुमार – प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, धारणी, ITDP, अमरावती यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
19. अनमोल सागर – सहाय्यक जिल्हाधिकारी, देवरी उपविभाग, गोंदिया यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, लातूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
20. आयुषी सिंह – प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, जव्हार, ITDP, पालघर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
21. वैष्णवी बीव – सहायक जिल्हाधिकारी, तुमसर उपविभाग, भंडारा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प., अकोला.
२२. पवनीत कौर यांची अमरावतीच्या जिल्हाधिकारी पदावरुन पुण्याच्या जीएसडीए संचालक पदी बदली
२३. गंगाथरण डी. यांची नाशिकच्या जिल्हाधिकारीपदावरुन मुंबई महापालिकेच्या सह आय़ुक्तपदी बदली
२४. अमोल जगन्नाथ येडगे यांची यवतमाळच्या जिल्हाधिकारीपदावररुन महाराष्ट्र राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण येथे बदली
२५. शानमुगराजन एस. यांची वाशिम जिल्हाधिकारी पदावरुन अतिरिक्त विकास आयुक्त (उद्योग) मुंबई येथे बदली
२६. विजय चंद्रकांत राठोड यांची जालना जिल्हाधिकारी पदावरुन महाराष्ट्र उद्योजक विकास महामंडळ मुंबईचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली
२७. निमा अरोरा यांची अकोला जिल्हाधिकारीपदावरुन माहिती तंत्रज्ञान विभाग येथे संचालक म्हणून बदली
२८. वैभव दासू वाघमारे यांची गडचिरोलीतील अहेरी येथे प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती
२९. संतोष सी. पाटील यांची उपमुख्यमंत्र्यांचे सह सचिव पदावरुन कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली
30. आर.के.गावडे यांची झेडपी नंदुरबार मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून जिल्हाधिकारी, परभणी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आहे.
31. आंचल गोयल यांची जिल्हाधिकारी, परभणी पदावरून अतिरिक्त महापालिका आयुक्त, नागपूर महानगरपालिका, नागपूर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
32. संजय खंदारे, यांची मुख्य सचिव, पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
33. तुकाराम मुंढे, सचिव, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई पदावरून सचिव (AD), कृषी आणि ADF विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
34. जलज शर्मा. जिल्हाधिकारी धुळे पदावरून यांची जिल्हाधिकारी नाशिक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे
35. डॉ.ए.एन.करंजकर आयुक्त, ESIS, मुंबई पदावरून यांची महापालिका आयुक्त, नाशिक महानगरपालिका, नाशिक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
36. आर.एस.चव्हाण, सहसचिव, महसूल आणि वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
37. पृथ्वीराज बी.पी. जिल्हाधिकारी, लातूर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी, नागपूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
38. रुचेश जयवंशी यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, NRLM, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
39. मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी, सोलापूर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, महात्मा फुले जन आरोग्य योजना सोसायटी, राज्य आरोग्य विमा संस्था, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
40. मकरंद देशमुख उपायुक्त (महसूल), कोकण विभाग, मुंबई यांची सहसचिव, मुख्य सचिव कार्यालय, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
41. डॉ.बी.एन.बस्तेवाड मुख्य महाव्यवस्थापक (L&S), MSRDC, मुंबई यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, Z.P., रायगड म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
