मोठी बातमी! बस तळ्यात कोसळली, १७ जण ठार

बांगलादेशमधून मोठी बातमी समोर आली आहे. बस तळ्यात कोसळल्यानं मोठा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये सतरा लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन लहान मुलांचा देखील समावेश आहे.

तर या अपघातामध्ये 35 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्घटना शनिवारी दुपारी बांगलादेशातील छत्रकांडा परिसरात घडली आहे. चालकाच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या बसमध्ये क्षमतेपक्षा अधिक प्रवासी होते अशीही माहिती समोर आली आहे.

क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी एएनआय वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार ही बस बशर स्मृती परिवहनची होती. या बसची क्षमता 52 प्रवाशांची असताना देखील या बसमधून 60 प्रवासी प्रवास करत होते.

ही बस शनिवारी सकाळी नऊ वाजता पिरोजपूरवरून भंडरियाकडे निघाली होती. त्यानंतर ही बस बरिशाल -खुलना राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना हा अपघात झाला. बस तळ्यात कोसळली. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला असावा अशी माहिती समोर येत आहे.

Leave a Comment