संगमनेर : अंजली गोसावी वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी बनली वकिल ; दशनाम गोसावी समाज संघटनेकडून सत्कार

संगमनेर(DSNews24 /किरण पुरी) तालुक्यातील मंगळापूर येथील शांताराम गोसावी यांची कन्या कु. अंजली गोसावी हिने बी.ए.एल.एलबी ची पदवी घेत घवघवीत यश मिळविले आहे. तसेच वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी अंजली वकिल बनली आहे.

अंजली गोसावी हिने घवघवीत यश मिळविल्याबद्दल संगमनेर तालुका दशनाम गोसावी समाज संघटनेच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आलाय. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळापूर येथे जाऊन अंजली गोसावी हिचा सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सत्कार करून शाबासकीची थाप दिलीय.

यावेळी संगमनेर तालुका दशनाम गोसावी समाज संघटनेचे तालुकाध्यक्ष दशरथ गोसावी, मुख्य प्रवर्तक भागवत गिरी, कार्याध्यक्ष चंदन गोसावी, सचिव सोमनाथ गोसावी, उपाध्यक्ष संतोष पुरी, उपाध्यक्ष रणजित गिरी, उप कार्याध्यक्ष सुनील गोसावी, संघटक प्रदिप गोसावी, सहसचिव प्रविण गोसावी, सदस्य ओंकार गोसावी, बाळासाहेब गोसावी, महंत नारायण गोसावी, इंदूबाई गोसावी, लिलाबाई गोसावी, राणी गोसावी, संतोष गोसावी, राजाराम गोसावी, अध्यक्ष माधव पुरी, शंकर गोसावी, गोरख गोसावी आदि समाजबांधव उपस्थित होते.

दरम्यान, अंजली गोसावी हिने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत हे यश संपादन केले आहे. वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी अंजलीने हे यश मिळविले आहे. अंजलीने इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण मंगळापूर येथे पुर्ण केले. त्यानंतर संगमनेर येथील श्रमीक ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता ११ वी १२ वीचे वाणिज्य शाखेतून शिक्षण पुर्ण केले.

तसेच त्यानंतर १२ वी नंतर २०१७ -१८ साली बीएएलएलबी ला श्री ओंकारनाथ मालपाणी लॉ कॉलेज संगमनेर येथे प्रवेश घेत कायद्याविषयी अभ्यास सुरू केला. जवळपास पाच वर्षांच्या अथक परिश्रमानंतर स्वतः च्या जिद्दीला अंजलीने बीएएलएलबी यशस्वीपणे पुर्ण केली. विशेषत; कुठलाही क्लास न लावता हे यश संपादन केले आहे. या यशाबद्दल अंजलीचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

Leave a Comment