संगमनेर तालुका दशनाम गोसावी समाज संघटनेने राबविले दंडकारण्य वृक्षारोपण अभियान

संगमनेर (DSNews24/किरण पुरी) पर्यावरण संवर्धन हे अत्यंत महत्त्वाचे असून यासाठी सहकार महर्षी स्व. भाऊसाहेब थोरात यांनी १६ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या दंडकारण्य अभियान संगमनेर तालुक्यात वृक्षसंवर्धन संस्कृती वाढली आहे.

वृक्षसंवर्धन हीच परंपरा जोपासत संपूर्ण तालुका हा हिरव्या वनराईचा तालुका निर्माण करण्यासाठी प्रयत्न असून लाखो वृक्षांचे रोपण व संवर्धनासाठीची ही मोठी लोक चळवळ ठरली.

हेच औचित्य साधून आज परम पूज्य पावन भूमी यमनागिरी बाबा मठ सुकेवाडी येथे संगमनेर तालुका दशनाम गोसावी समाज संघटनेच्या वतीने दंडकारण्य अभियान राबवत वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी सुकेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच योगिता सातपुते, उपसरपंच सुभाषराव कुटे, का.पाटील पोलिस पाटील किशोर शेटे, गोरख सातपुते, स़ंघटनेचे मार्गदर्शक बाबासाहेब गोसावी, किशोर गोसावी, संगमनेर तालुका दशनाम गोसावी समाज संघटनेचे मुख्य प्रवर्तक भागवत भारती, अध्यक्ष दशरथ गोसावी, सचिव सोमनाथ गोसावी सर, कार्याध्यक्ष चंदन गोसावी, उपाध्यक्ष संतोष पुरी, रंजित गिरी, सहसचिव प्रविण गोसावी, संघटक प्रदीप गोसावी, सल्लागार लक्ष्मण भारती, रविंद्र गिरी‌, काशिनाथ गोसावी, किरण पुरी, सहकोषाध्यक्ष गणेश गोसावी, सदस्य राजाराम गोसावी, ओंकार गोसावी, आण्णासाहेब गिरी (वनीकरण विभाग), सुभाष गोसावी, लालू गोसावी, भाऊसाहेब गोसावी, रमेश गोसावी आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी महाराष्ट्र राज्य वनीकरण विभागाच्या वतीने विविध वृक्षांची रोपे उपलब्ध करून देण्यात आली. याकामी संगमनेर तालुका दशनाम गोसावी समाज संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी वृक्षारोपणासाठी बहुमोल परिश्रम घेतले.

Leave a Comment