कांद्याला मिळाला ‘हा’ भाव

राहूरी : वांबोरी उपबाजारात काल झालेल्या कांदा लिलावात 15 हजार 321 कांदा गोण्याची आवक झाली.

एक नंबरचा गावराण कांदा 1 हजार 305 रुपये ते 1 हजार 800 रुपये, दोन नंबरचा कांदा 805 रुपये ते 1 हजार 300 रुपये तर तीन नंबरचा कांदा 100 रुपये ते 800 रुपये भावाने विकला गेला.

तसेच गोल्टी कांद्याला 600 रुपये ते 1 हजार 100 रुपये भाव मिळाला. अपवादात्मक 75 कांदा गोण्यांना 2 हजार 100 रुपये, 65 कांदा गोण्यांना 2 हजार रुपये तर 68 कांदा गोण्यांना 1 हजार 900 रुपये भाव मिळाला.

Leave a Comment