मोठी बातमी! शिरुर लोकसभा मतदारसंघावर शिवसेना ठाकरे गटाचा दावा

मातोश्रीवर झालेल्या बैठकीत शिरुर लोकसभा मतदारसंघावर शिवसेना ठाकरे गटानं दावा केला आहे. लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या कशाप्रकारे सीट निवडून येतील याबतात माहिती या बैठकीत घेतली, तसेच विधानसभेच्या मतदारसंघाचा देखील आढावा घेतला.

सध्याची परिस्थिती आणि पाठीमागची परिस्थिती काय होती आणि कशाप्रकारे निवडणूक लढवून आपल्याला जागा जिंकता येईल याबद्दलची माहिती उद्धव ठाकरेंनी घेतली.

दरम्यान, शिरुर मतदारसंघ हा शिवसेनेचा पारंपारिक मतदारसंघ राहिला आहे. त्यामुळं या जागेवर शिवसेनेनेच उमेदवारी लढवली पाहिजे, अशा प्रकारच्या भावना स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या.

सध्या शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे हे खासदार आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला होता. सध्या आढळराव पाटील हे शिवसेनेच्या शिंदे गटात सामील झाले आहेत.

Leave a Comment