काँग्रेसचे ४५ आमदार भाजपच्या संपर्कात, मोठी खळबळ 

Karnataka Politics: कर्नाटकात भाजपकडून पुन्हा ऑपरेशन लोटस राबवले जाऊ शकते, अशी मोठी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. याचे कारण एका भाजपने नेत्याने मोठा दावा करत काँग्रेसचे ४५ आमदार आमच्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे.

यामुळे काँग्रेसच्या गोटात पुन्हा एकदा खळबळ उडाल्याचे म्हटले जात आहे. यावरून कर्नाटकच्या राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

कॉंग्रेसचे ४५ आमदार आपल्या संपर्कात असल्याच्या भाजप राष्ट्रीय संघटना सचिव बी. एल. संतोष यांच्या दाव्यावरून कॉंग्रेसमध्ये तीव्र पडसाद उमटले.

राज्यातील कॉंग्रेस सरकार कोसळेल, अशा भ्रमात भाजप असल्याची टीका करून संतोष यांचे हे स्वप्न साकार होणार नसल्याच्या प्रतिक्रिया काँग्रेस नेत्यांनी दिल्या.

उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी उपरोधिकपणे सांगितले की, बी.एल. संतोष यांनी सर्व काँग्रेस आमदारांशी संपर्क साधला, तर आम्हाला आनंदच होईल, असा टोला लगावला.

Leave a Comment