दिग्गज माजी कर्णधाराच निधन, क्रिकेट विश्वावर शोककळा 

क्रिकेट विश्वातून अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे. झिम्बाब्वे संघाचे माजी कर्णधार हीथ स्ट्रीक(Heath Streak) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 49 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

याआधी हीथ स्ट्रीक यांच्या निधनाची अफवा समोर आली आहे. त्यावेळी स्ट्रीक यांच्या घरच्यांकडून ही आपण जिवंत असून निधन ही अफवा असल्याची माहिती दिली होती. आता हीथ स्ट्रीक यांच्या पत्नी आणि वडिलांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून हीथ स्ट्रीक हे कर्करोगाच्या आजारासोबत झुंज देत होते. रविवारी रात्री एकच्या सुमरास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हीथ स्ट्रीक यांच्या निधनाच्या बातमीने क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. हीथ स्ट्रीक यांच्या पत्नीने याबाबत पोस्ट करत माहिती दिली.

हीथ स्ट्रीक यांनी 65 कसोटी सामने आणि 189 वन डे सामने खेळले असून कसोटीमध्ये 1990 तर 3 हजार धावा केल्या आहेत. त्यासोबतच कसोटीमध्ये 216 आणि वन डे मध्ये 239 विकेट्स घेतल्या आहेत. हीथ हा झिम्बाब्वेकडून कसोटी आणि वन डे फॉरमॅटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू आहे.

Leave a Comment