बिग ब्रेकिंग! अजितदादा बनले पुण्याचे पालकमंत्री 

राज्यातील 11 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यानुसार अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री झाले आहेत. त्यांच्याआधी चंद्रकांत पाटील हे पुण्याचे पालकमंत्री होते.

चंद्रकांत पाटील यांच्याकडे आता सोलापूर आणि अमरावती या जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे असलेले बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात आले आहे.

Leave a Comment