मोठी बातमी! राज्यातील ११ जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर, वाचा सुधारीत यादी….

पालकमंत्रिपदाची नावे जाहीर करण्यात आली आहेत. एकूण ११ जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची सुधारित यादी समोर आली आहे. यामध्ये अपेक्षेनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद आले आहे.पुणे हा अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो, पण राज्य सरकारमध्ये कालपर्यंत मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्री पद होते. जे आज पुन्हा अजित पवार यांच्याकडे देण्यात आले आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांची उचलबांगडी करत अजित पवारांनी पुण्याचे पालकमंत्रिपद राखले आहे. त्यामुळे अजित पवार हेच पुण्याचे कारभारी ठरले आहेत.

चंद्रकांत पाटील यांना सोलापूर आणि अमरावतीचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे.

 

सुधारित ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे :

पुणे – अजित पवार

 

अकोला – राधाकृष्ण विखे-पाटील

 

सोलापूर- चंद्रकांतदादा पाटील

 

अमरावती- चंद्रकांतदादा पाटील

 

भंडारा- विजयकुमार गावित

 

बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील

 

कोल्हापूर- हसन मुश्रीफ

 

गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम

 

बीड- धनंजय मुंडे

 

परभणी- संजय बनसोडे

 

नंदूरबार- अनिल भा. पाटील

 

वर्धा – सुधीर मुनगंटीवार

Leave a Comment