पंकजा मुंडेंच्या निर्णयास नगर जिल्ह्यातील ‘या’ आमदाराचा पाठिंबा 

ऊसतोड मजूर,मुकादम व वाहतूक संघटना यांच्या दरात वाढ करावी या मागणीसाठी माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली मागण्यांची सरकारकडून पूर्णता होईपर्यंत संप करण्याचा निर्णय घेण्यात आला.

आमदार मोनिका राजळे यांच्या व्हाईट हाऊस संपर्क कार्यालयात झालेल्या बैठकीत राजळे यांनी देखील या संपाला सहमती दर्शवत पाठिंबा जाहीर केला आहे.

या मागण्याविषयी ३० सप्टेंबरला आमदार मुंडे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली होती. या बैठकीत संप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

पाथर्डी तालुक्यात जवळपास पन्नास हजार ऊसतोड मजूर असून त्यांचाही या संपाला पाठिंबा मिळावा म्हणून आमदार माेनिका राजळे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. ऊसतोड कामगार संघटनेच्या मागण्यावरून येत्या काळात साखर संघ व मुंडे यांच्यात संघर्ष होणार असल्याचे मानले जात आहे.

तीन वर्षांपूर्वी झालेल्या साखरसंघ व ऊसतोड मजूर संघटना यांच्यात वेतनवाढीचा करार झाला होता. त्यानंतर महागाई वाढूनही वेतनवाढ मिळत नसल्याने चालू हंगामात संप करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यास आमदार माेनिका राजळे यांनी पाठींबा दिला आहे.

Leave a Comment