अंगणवाडी सेविकांनंतर आता एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळीदेखील गोड होणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांना शिंदे – फडणवीस सरकारने गोड बातमी दिली आहे.
यामुळे एसटी कर्मचारी आणि त्यांच्या परिवाराच्या चेहऱ्यावर हास्य फुलणार आहे. सरकारकडून एसटी महामंडळाला मोठी मदत केली जाणार आहे.
एसटी महामंडळाला दिवाळीपूर्वी वेतनासाठी 378 कोटींची मदत महाराष्ट्र सरकारकडून दिली जाणार आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन दिवाळीपूर्वी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
