अहमदनगर ब्रेकिंग! डंपरच्या धडकेत विद्यार्थी ठार

अहमदनगर : नगर शहरातून बेकायदेशीररित्या प्रवेश करणार्‍या जड वाहतुकीमुळे डीवायएसपी चौकात घडलेल्या अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.

शेख महंमद अनीस खलीद (वय 19 रा. सीआयव्ही कॉलनी, मुकुंदनगर) असे मयत विद्यार्थ्यांचे नाव आहे. गुरूवारी (दि. 2) सकाळी हा अपघात झाला.

याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, शेख हा सायकलवरून जात असताना त्याला हायवा डंपरने धडक दिली आहे. पोलिसांनी डंपरसह चालकाला ताब्यात घेतले आहे.

शेख महंमद अनीस खलीद हा शालेय विद्यार्थी शाळेतून आपल्या घरी जात असताना डीवायएसपी चौकामध्ये 14 टायर डंपरने शेख यास उडवले. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे नगर शहरातील अवजड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहरामध्ये सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

Leave a Comment