महाराष्ट्रातील कोकण पट्ट्यासह मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि इतर भागांमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आणि अनेकांचीच तारांबळ उडाली. दिवाळीच्या तयारीसाठी म्हणून घराबाहेर पडलेल्या अनेकांनाच पावसानं सळो की पळो करून सोडलं.
तिथं मराठवाड्यातही अशीच परिस्थिती पाहायला मिळाली. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्याच्या कोकण पट्ट्यासह दक्षिण भागामध्येही पुढील दोन दिवस जोरदार पावसाची हजेरी आणि ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं. किंबहुना या अवकाळी पावसामुळं कमाल आणि किमान तापमानामध्येही चढ उतार होण्याची चिन्हं आहेत.
