Jammu Kashmir : काश्मिरमधून एक भीषण बस अपघाताची घटना समोर आली आहे. दोडा जिल्ह्यातील आसार भागात त्रंगलजवळ एक प्रवासी बस रस्त्यापासून 250 मीटर खोल दरीत कोसळल्याचे सांगण्यात येत आहे.
ही बस किश्तवाडहून जम्मूकडे निघाली होती. या दुर्घटनेत २० पेक्षा जास्त प्रवासी दगावल्याची भिती वर्तवण्यात येत असून स्थानिक अधिकारी, पोलिस आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य सुरू केले आहे.
याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, जम्मू काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात (Doda Bus Accident) भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. किश्तवाडहून जम्मूला जाणारी बस दोडा जिल्ह्यातील आसार भागातील त्रंगलजवळ रस्त्यापासून 250 मीटर खोल दरीत कोसळली. अपघातात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भिती वर्तवली जात आहे.
या भीषण अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि बचाव पथकांसह स्थानिक अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. सध्या बचावकार्य सुरू आहे. डोडा येथील पोलिस नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या प्राथमिक अहवालानुसार मृतांची संख्या २० किंवा त्याहून अधिक असू शकते.
