बिग ब्रेकिंग! भाऊबीजेच्या दिवशी स्वतःवर गोळी झाडून पोलीस कॉन्स्टेबलची आत्महत्या

सोलापूर मध्ये पोलीस शिपायाने गोळी झाडून घेऊन जीवन संपवले. ही घटना आज (बुधवार) सकाळी साडेआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

पोलीस शिपाई राहुल अरुण शिरसट (वय ४०) बक्कल नंबर २५ राहणार ब्लॉक नंबर २५ केशवनगर पोलीस वसाहत पोलीस आयुक्तालयाच्या पाठीमागे सोलापूर असे मरण पावलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे.

पोलीस शिपाई शिरसाट हे पोलीस आयुक्तांच्या बंगल्यावर गार्ड ड्युटीसाठी होते. आज बुधवार सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ड्युटी वरून उतरल्यानंतर घरी जाऊन त्यांनी त्यांच्या एसएलआर बंदुकीतून स्‍वत:वर गोळी मारून घेतली.

ही घटना समजतात वरिष्ठ पोलीस अधिकारी हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्‍यान शिरसाट यांच्या जीवन संपवण्यामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही.

Leave a Comment