भाजप नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून मोठा दावा करण्यात आलाय. लोकसभा निवडणुकीआधी पुढच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात तिसरा भूकंप घडेल, असा दावा गिरीश महाजन यांच्याकडून करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या पक्षांमध्ये फूट पडली आहे. त्यानंतर आता काँग्रेस पक्षात फूट पडेल, असा दावा भाजपकडून केला जातोय. त्यानंतर सुशीलकुमार शिंदे यांचं वक्तव्य आणि नंतर त्यांची चंद्रकांत पाटील यांच्यासोबतची भेटीची बातमी समोर आली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय.
